| आंबेत | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडीपट्टा सावित्री किनारपट्टीवर असणार्या मरीयम खारगाव लिपनिवावे हद्दीत शेतकर्यांच्या शेकडो एकर शेतात मागील वर्षी खारभुमीवर असणारे बंधारे फुटून या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते हीच बाब लक्षात घेता दैनिक सागर या वृत्तपत्रात ही बातमी प्रसारित करण्यात आली होती यानंतर शेतकर्यांच्या हिताचा प्रश्न शासन दरबारी निदर्शनात आणण्यात आला, याबाबत संबंधित आमदार अनिकेत तटकरे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून प्रशासनाच्या ही बाब निदर्शनात आणून दिली त्यानंतर तात्काळ या कामासाठी संबंधित खात्याकडून सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
सावित्री नदीच्या किनारपट्टीवर असलेली येथील शेतकर्यांची शेती ही लगत असणार्या खरबंधारे यांच्या सहाय्यावर सुरक्षित होती मात्र कित्येक वर्षे नादुरुस्त अवस्थेत असलेली ही भूमी अखेर मागील वर्षी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेतकर्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून संपूर्ण शेती उध्वस्त झाली आहे याच गोष्टीची प्रशासनाने दखल घेऊन आज येथील खरबंधारे मंजूर केले आणि अखेर या कामाला सुरुवात देखील झाली आहे, त्यामुळे स्थानिक शेतकर्यांसह परिसरातील गावकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.