कराटे प्रशिक्षक गायकवाड यांना पुरस्कार

। रसायनी । वार्ताहर ।

ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन व इंग्लिश मिडीयम स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांनी ऑल इंडिया स्पोर्ट्स डायमंड अवॉर्ड या पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारांचे वितरण कृष्णसागर हॉटेल, बारामती येथे प्रदान करण्यात आले.

ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशनने 2023-24 साठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा केली. त्यामध्ये सिकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी व एसएमडीएल महाविद्यालय कळंबोली येथील मार्शल आर्ट ऍक्टिव्हिटीचे प्रमुख प्रशिक्षक माननीय भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांची ऑल इंडिया स्पोर्ट्स डायमंड अवॉर्ड 2024 साठी निवड झाली.

ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन व इंग्लिश मिडीयम स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष डोईफोडे व उपाध्यक्ष इंगोले पाटील तसेच पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रसिद्ध सिने अभिनेते, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन सोशल ब्युरो कमिटी, सल्लागार कुरबर/धनगर महासंघ कर्नाटक राज्य, अ‍ॅड. महेश देवकाते पाटील व बारामतीचे पोलीस उपनिरीक्षक राऊत आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

आजपर्यंत त्यांनी हजारो मुला मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिले. अतिशय उत्कृष्ट, मेहनती व उदरमतवादी प्रशिक्षक आहेत. 2010-11 मध्ये त्यांना टाटा मोटर्स पुणे येथे आर.एन.डी. या विभागात नोकरी मिळाली होती परंतु फक्त स्वतःचा विचार करून त्या नोकरीं चा स्वीकार न करता महिला व मुलींच्या सबली व सशक्तीकरणासाठी मार्शल आर्ट या खेळाचा प्रचार प्रसार देशभर व्हावा यासाठी मिळालेल्या नोकरीचा त्याग करून त्यांनी आपली 13 वर्ष मुलं-मुली व महिला यांना आत्मसंरक्षण कला शिकविण्यासाठी समर्पित केले.

प्रत्येक व्यक्तीने दिवसातील किमान एक तास मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले तर ती व्यक्ती रोगमुक्त व भयमुक्त होऊ शकते. तसेच, खासकरून महिला व मुलींनी आत्मसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे, स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भारत देशातील लोकांना मार्शल आर्ट आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देत राहीन. आत्मसंरक्षण कला प्रशिक्षण हेच माझे आयुष्य व हेच माझे जीवन, असे प्रतिपादन मास्टर भूपेंद्र गायकवाड यांनी केले.

Exit mobile version