| उरण | वार्ताहर |
डोंगर परिसरात राहणार्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे उरण कंठवळी गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांना नुकताच अमरदीप बाल विकास फाऊंडेशन महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था पनवेलकडून राज्यस्तरीय कर्तृत्व गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नामदेव ठाकूर हे उरण सामाजिक संस्थेचे ते सदस्य आहेत.
नामदेव ठाकूर यांच्या समाजकार्याची दखल या अगोदर विविध सामाजिक संस्थांबरोबर उरण तालुका तहसीलदार, पनवेल तालुका तहसीलदार, खालापूर तालुका तहसीलदार, पनवेल प्रांत आदिवासी विकास प्रकल्प पेण अशा शासकीय कार्यालयानेदेखील दखल घेऊन त्यांना सन्मानित केले होते. नामदेव ठाकूर यांनी आदिवासी बांधवांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार करून पुढाकार घेतला, त्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड ,घरकुल बचत गटाचे महत्त्व त्याच्यामध्ये उल्लेखनीय काम केले. त्यांना मिळालेल्या सन्माना बदल आदिवासी बांधवांबरोबर विविध पक्षांच्या पदाधिकारी व संस्थेच्या सभासदांनी ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.