ऋचा जोशी यांना पुरस्कार

। नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्स फाउंडेशन स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या रसायनशास्त्र विषयाच्या शिक्षिका श्रिमती ऋचा अभिजित जोशी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल देण्यात येणारा गुणवंत व कतृत्वान शिक्षक पुरस्कार 2022 ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

माणगाव येथील अशोकदादा साबळे विद्यालयात रविवार दि. 4 डिसेंबरला संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नागो गाणार, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू, सहकार्यवाह नरेंद्र वातकर आदींसह शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Exit mobile version