सुवर्णा जाधव यांना पुरस्कार

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रुपेश जाधव यांना आविष्कार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर इंडिया या सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार 2024ने रविवारी (दि.12) सकाळी 11वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बाजी प्रभू देशपांडे चौक, पन्हाळगड, जि. कोल्हापूर याठिकाणी झालेल्या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

आविष्कार फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रात गेली 18 वर्षे कार्यरत आहे. या फाऊंडेशनतर्फे समाजात वेगवेळ्या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येतो. यावर्षी फाऊंडेशनतर्फे पन्हाळगड याठिकाणी भव्य दिव्य अशा कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात माणगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव यांचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांचा संस्थेतर्फे राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय पवार, राज्य पुरस्कार निवड समिती सदस्य माधुरी सावंत, फाउंडेशनचे रायगड जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोहिते आदी मान्यवरांसह राज्यभरातून पुरस्कारती व नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होती. सुवर्णा जाधव यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version