विजय कोकणे यांना डॉक्टरेट पदवी बहाल

। रसायनी । वार्ताहर ।

डॉ. विजय हिरामण कोकणे संचालक जन शिक्षण संस्थान रायगड यांचा गोवा येथे ‘कॅम्ब्रीज डिजिटल युनिव्हर्सिटी विद्यापीठद्वारा दक्षिण गोवा येथे आयोजीत आंतरराष्ट्रीय दिक्षांत सोहळा’ पार पडला. या कार्यक्रमप्रसंगी ‘महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकास समाजकार्य लेखन व संशोधनासाठी’ त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. याप्रसंगी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, युरो आशिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सेबॅस्टियन मेंडेस, वेंकटेश्‍वर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ललित कुमार सागर, ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ बोस्टनचे प्रेसिडेंट संजीब कुमार बनिक, भारतीय पद्म पुरस्कार विजेते डॉ. रोशन पालेवार, ऑल इंडिया कौन्सिल फॉर फिजिकल थेरपीचे अध्यक्ष डॉ. मानिकांत, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिझ शेख यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन डॉ. विजय हिरामण कोकणे यांना सन्मानीत करण्यात आले.

Exit mobile version