| अलिबाग | वार्ताहर |
मध्यप्रदेशातील इंदोर येथे मॉ भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय वैदीक शास्त्र विद्यापीठातर्फे अलिबाग येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष असणार्या श्रीकांत सदानंद पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे. इंदोर येथील सयाजी हॉटेलच्या सभागृहात विद्यापीठाच्या कुलपती डॉ.दिप्ती भादोरीया व कुलगुरू डॉ.विद्या भूषण सिंग, खा. शंकर लावावी, डॉ.संतोष भार्गव, आचार्य रघुनंदन, रोशनी शर्मा, संतोष विधवांनी, डॉ.मणिलाल शिंपी, विजय पाटील उपस्थित होते.
त्यांनी मागील चाळीस वर्षात केलेल्या भरीव शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना ऑनररी डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ.श्रीकांत पाटील यांचा रायगड जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटना, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटना तसेच आर.एस.पी. संघटना व आगरी साहित्य विकास मंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. दैनिक कृषीवलचे पत्रकार म्हणूनही त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.