प्रकाश गायकवाड राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

| रसायनी | वार्ताहर |

लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि टी.एम. जी क्रियेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रिस रसायनी येथील प्रकाश ग्यानोजी गायकवाड यांना राज्यस्तरीय टी.एम.जी अनमोल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे हा सन्मान सोहळा पार पडला. राज्यातील तेहतीस जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सत्कार मूर्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले. जेष्ठ समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड हे गेली तीस वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. गरजूवंताना नेहमीच सहकार्य करत असतात. अन्नदान देणे, गोरगरीबांना किराणा सामान वाटप, गरजूवंताना व रुग्णांना आर्थिक सहाय्य, ज्येष्ठांसाठी विविध आरोग्यविषयक मोफत शिबिर, विद्याथ्यांसाठी शालोपयोगी वस्तू आदी कार्य त्यांच्याकडून सुरुच आहे. त्यांच्या या कार्यांची दखल घेवून.

प्रकाशशेठ गायकवाड यांना अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व आकर्षक ट्राफी देवून गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळ्यासाठी अभिनेते जयवंत वाडकर, संस्थेचे सर्वेसर्वा नासीर खान, अध्यक्षा सलमा एन.खान, प्रमुख समन्वयक डॉ.शैलेंद्र पवार अभिनेते झाकीर खान, देवेंद्र भुजबळ, निवृत्त पोलीस अधिकारी सुनीता नाशिक कर डॉ. राजेंद्र येवले आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version