आदिवासींना ‘लाडकी बहीण’बाबत जनजागृती

तहसीलदारांचा योजनांच्या माहितीसाठी दौरा

| पोलादपूर | प्रतिनिधी |

राज्यात सर्वत्र जोरदार स्वागत होत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आदिवासी वाड्यांमध्येदेखील माहिती व्हावी यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी शुक्रवारी दिवसभर तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये या योजनेसह शासनाच्या अन्य वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दौरा केला.

पोलादपूर तहसील कार्यालयातील कर्मचारी व तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा दौरा आखण्यात आला. सर्वात आधी चोळई येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयातील तरुणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता चांभारगणी आदिवासीवाडी, करंजे आदिवासीवाडी, साखर आदिवासीवाडी, सडवली आदिवासीवाडी येथील मार्गदर्शनावेळी पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तहसीलदार घोरपडे यांनी जनतेसोबत संपर्क साधून मार्गदर्शन केले.

Exit mobile version