| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली वाहतूक शाखेने रिक्षा चालक-मालक तसेच टॅक्सी चालक व मालक यांना वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन केले आहे. कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बनकर तसेच सपोनि शिर्के, पो.उपनिरीक्षक साठे व पोलीस अंमलदार यांनी खांदेश्वर रेल्वे स्टेशन येथे रिक्षा चालक-मालक तसेच टॅक्सी चालक व मालक यांना वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच, नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या न करणे, बस स्टैंडवर रिक्षा पार्क न करणे, सिग्नल जम्पिंग न करणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर न करणे, दारू पिऊन गाडी न चालवणे, प्रवाशांशी सौजन्याने वागणे, मीटर प्रमाणे भाडे आकारणी करणे, भाडे नाकारू नये, वाहनांची कागदपत्रे अद्यावत करणे, लेन कटिंग करू नये, स्वच्छ युनिफॉर्म परिधान करणे याबाबत प्रबोधन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर वेळी 25 ते 30 रिक्षा चालक व मालक हजर होते. तसेच, बरेचसे रेल्वे प्रवासी सुद्धा हजर होते.