प्रिझम संस्थेच्या कलाकारांकडून पथनाट्य सादर
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड पोलीस दल अंतर्गत अशोक दुधे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे- अपर पोलीस अधीक्षक, रायगड, आर.एन. जगताप- पोलीस निरीक्षक सुरक्षा शाखा, पोलीस कल्याण शाखा (अति. कार्य.), रायगड-अलिबाग यांच्या प्रमख मार्गदर्शनाखाली दि. 2 ते 8 जानेवारी रेझिंग डे सप्ताहनिमित्त ‘ऑन ड्युटी चोवीस तास’ या पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. पोलीस विभागाच्या कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच पोलीस काका, पोलीस दीदी, 112 हेल्पलाईन, बीट मार्शल, दमिनी पथक, पोलीस मित्र याविषयी जनतेला माहिती व्हावी, सायबर क्राईम होऊ नये यासाठी कोणती दक्षता घ्यावी, याविषयी देखील मांडावा जेट्टी व चोंढी नाका येथे जनजागृती करण्यात करण्यात आली.
यावेळी एएसआय किशोर पाटील, पीएन 2146 रोगे, एएसआय जितेंद्र पाटील, एचसी 2064 शिंदे, एचसी 1003 सोलसे आदी पोलीस सहकारी, पोलीस बँड पथक उपस्थित होते. या पथनाट्याचे नेतृत्व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी या करीत असून, कलाकार म्हणून विनोद नाईक, अमृता शेडगे, प्रसाद अमृते, सागर पाटील, तुषार राऊळ, धनश्री मोरे, निशिता पाटील, मानसी पाटील, मानसी पोसरेकर, श्रीराम जांभळे आदी कलाकार सहभागी झाले आहेत. या पथनाट्यातून रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे तपस्वी गोंधळी यांनी यावेळी सांगितले.