। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाना पाटील हायस्कूल मद्ये जिल्हा वाहतूक शाखाच्या वतीने वाहतुकीचे नियम पाळण्यासाठीचे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तर पोयनाड नाका ट्राफिक चौकी येथे रियल रिक्षा मिनीडोयर रिक्षा काली पिवळी टॅक्सी यांचे चालक-मालक यांना माननीय पोलीस अधीक्षक रायगड अशोक दूधे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक पाटील जिल्हा वाहतूक शाखा यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे सा बाबतीत त्यांचा वडीलांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. यासाठी पालक वर्गाने मुलांना गाडी हातात देऊ नये, हेल्मेट वापरावे, सीट बेल्टचा वापर करावा तसेच रस्त्या ओलांडताना उजवीकडे डावीकडे पाहून क्रॉस करणे आदी बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी नाना पाटील हायस्कूलचे प्रा.कुलकर्णी, बर्गे, सोनवणे, अनिल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.