गव्हाण फाटा वाहतूक पोलिसांतर्फे प्रबोधन

। उरण । वार्ताहर ।

अवजड वाहन चालविताना वाहन चालकाने नेहमी काळजी घेणे आवश्यक आहे. दारु पिऊन वाहने चालवू नये, त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. वाहन चालविताना योग्य नियम पाळले तर अपघाताचे प्रमाण कमी करता येऊ शकते, असे प्रतिपादन गव्हाण फाटा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन बडगुजर यांनी केले.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाण फाटा येथे अवजड वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी प्रबोधनपर कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. अनेकदा काही कारणांमुळे अवजड वाहनांना प्रवेश बंद केला जातो, त्यावेळी पर्यायी मार्गाचा वापर कसा करावा. नेहमी सिटबेल्ट लावावा. वेग नियंत्रणात ठेवावा. ओव्हरटेकच्या नादी लागू नये. सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असेही बडगुजर यांनी सांगितले. परिसरातील टॅक्सी थांबे, ढाबे, हॉटेल या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनचालकांना पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी हवालदार हिरामण महाले, प्रशांत शिंदे, गणेश पाटील, राजेंद्र पाटील, राहुल काचरे, महेश खांडेकर उपस्थित होते.

Exit mobile version