| पनवेल | वार्ताहर |
ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे बदलून केंद्र सरकारने तीन नवे कायदे संसदेत मंजूर केले होते. हे 3 कायदे 1 जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत. त्या कायद्यांबद्दल सामाजिक जनजागृती व्हावी तसेच त्याचा समाजाकडून अंमल व्हावा या उद्देशाने आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने सिद्धिविनायक गणपती मंदिर सेक्टर 17, उलवे येथे, सामाजिक जनजागृती आणि मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
उलवे येथील रहिवासी तसेच उलवे नोडमधील रहिवासी आणि संघटना यांना भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-2023), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-2023) व भारतीय साक्ष (द्वितीय सुधारणा) (बीएस-2023) या 1 जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन कायद्यांबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष सचिन राजे येरुणकर, रविशेठ पाटील (संस्थापक, अध्यक्ष साई मंदिर वहाळ), सचिन घरत (उपसरपंच), विदाश्री भांगे ( डिजिटल फॉरेन्सिक व सायबर गुन्हे विशेषज्ञ), राजेंद्र घरत, राकेश घरत, विनोद थोरात, संदीप पाटील, निलेश पाटील, रोहन खंडू, साई पैकडे, अंकुश साळवे इत्यादी उपस्थित होते.