| उरण | प्रतिनिधी |
वीर वाजेकर महाविद्यालयात मंगळवारी (दि.9) राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब आणि इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त एड्सविषयी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समुपदेशक महादेव पवार, लॅब टेक्निशियन तृप्ती परजणे, राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रमधील महादेव पवार (समुपदेशक) यांनी विदयार्थ्यांना एचआयव्हीचा इतिहास, एचआयव्ही होण्याची कारणे, गैरसमज, लक्षणे, उपचार, एचआयव्ही होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी, एचआयव्ही एड्सचा टोल फ्री क्रमांक 1097, एचआयव्ही एड्स कायदा 2017 त्याचबरोबर प्रत्येकाने लग्नापूर्वी एचआयव्ही तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यकमाच्या शेवटी सर्व विदयार्थ्यांना आईसी वाटप करण्यात आले.







