मतदारांसाठी जनजागृती अभियान

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

तालुक्यातील वळके केंद्र नेहमीच गुणवत्तेत अग्रेसर असते. गटशिक्षण अधिकारी सुनील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.22) सकाळी प्रत्येक गावात मतदार जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. विविध शासकीय योजना, सहशालेय उपक्रम राबवण्यात वळके केंद्रातील सर्व पंधरा शाळाही अग्रेसर होत्या.

‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘वृद्ध असो की जवान, सर्वजण करा मतदान’ आदी घोषणा विद्यार्थ्यांनी गावातील प्रभात फेरीत दिल्या. वळके केंद्रातील चोरढे मराठी, चोरडे उर्दू, तळेखार, सावरोली, वेताळवाडी, शिवगाव, ताडगाव, ताडवाडी, सातिर्डे, वळके, शिरगाव, आमली, संजय नगर चेहेर, वाघुळवाडी या शाळांनी मतदार जनजागृती अभियान राबवले. सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीतून विविध घोषणा देत गावातील मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. शाळेने राबवलेल्या या उपक्रमाबाबत पालकांनीसुद्धा विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. रमेश भगत, राजेंद्र नाईक, संगीता भगत, राजाराम म्हात्रे, रुईकर, जगदीश चवरकर, देवानंद गोगर, हेमंत म्हात्रे, कल्याणी शिंदे, रेश्मा गुंडा आदी शिक्षकांनी या प्रभात फेरीचे उत्तम नियोजन केले होते.

Exit mobile version