| पाली/गोमाशी । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथिल विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नांदगावमध्ये प्रभातफेरी काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. ही प्रभात फेरी नांदगाव विद्यालयातून ग्रामपंचायत कार्यालय, कालभैरव मंदिर,संपूर्ण गावातून वंदे मातरम, भारत माता की जय, हर घर तिरंगा या विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. या प्रभात फेरीमध्ये वैशाली दिघे, सरिता म्हसकर, वर्षा जाधव, मनीषा ठाकूर, अस्मिता खैरे, निकेश खैरे,शांताराम लहाने,अशोक खैरे,संतोष कोंडे आदी ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे शिक्षक वृंद उपस्थित होते.