| रसायनी | प्रतिनिधी |
वाहतूक पोलीस रायगड यांच्यावतीने राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान, सानियो स्पेशल स्टील कंपनी खोपोली यांच्यावतीने चौक बाजारपेठेत ‘सुरक्षा यमाच्या दरबारी’ हे पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यातून वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षा याबाबत जनजागृती करण्यात आली. पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन संजय म्हामुणकर यांनी केले असून त्याचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. यावेळी नागरिक शालेय विद्यार्थी व बाजारपेठेत आलेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपघात प्रसंगी जखमींना मदत करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ यांनी करून वाहतुक नियमांची सविस्तर माहिती दिली. रस्ते सुरक्षा खूप महत्वाची आहे, याबद्दल देखील माहिती दिली. यावेळी रायगड जिल्हा वाहतूक पोलीस प्रमुख अभिजीत भुजबळ, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र आरोळे, सपोनि शिवाजी जुंदरे व चौक प्रभारी विशाल पवार हे उपस्थित होते.







