| दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय महिला संघ शनिवारी (दि.20) रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरला होती. तत्पूर्वी बीसीसीआयने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय महिला संघाच्या पारंपारिक निळ्या जर्सीऐवजी गुलाबी जर्सी घालण्यामागील कारण उघड केले आहे. भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी जर्सी घालण्यामागील कारण महत्त्वाचे आहे. भारतीय संघाचे उद्दिष्ट स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर अनेक खेळाडू गुलाबी जर्सी घालताना दिसत आहेत. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये बीसीसीआयने लिहिले आहे की, स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी भारतीय संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक खास गुलाबी जर्सी घालणार आहे.







