स्पर्शज्ञान विषयावर जनजागृती

। पनवेल । वार्ताहर ।
लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय येथे नुकताच स्पर्शज्ञान या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माधुरी नारखेडे, नीता लबडे, कांचन भोये, स्मिता साबळे, मनीषा जाधव, दीपिका भोईर, तसेच शिक्षिका व तेजस्विनी फाऊंडेशनच्या भाग्यश्री तांडेल यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉ.अ‍ॅड.निहा राऊत यांनी मुलींना व मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यांतील फरक विविध उदाहरणांच्या तसेच तक्त्त्यांच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अशावेळी मुला-मुलींनी घ्यावयाची दक्षता, काळजी व तत्परता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मुला मुलींकडून त्यांच्या समस्या व प्रश्‍न जाणून घेवून त्यांचे निरसन केले. राखी पाटील यांनी मुलांना स्पर्श कसा ओळखावा याविषयी मार्गदर्शन केले. जीविता पाटील यांनी सुसंस्कारित पिढी घडणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कला पाटील, संदीप वारगे, अमित देशमुख यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version