। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल येथील रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कर्णबधीर मुलांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली खांदा कॉलनी नवीन पनवेल येथेे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दिव्यांगांसंबंधी जनजागृतीच्या घोषणा देऊन लोकांचे लक्ष वेधून घेतले. विदयार्थी व शिक्षकांच्या हाती दिव्यांगांच्या संबंधी घोषवाक्यांचे पोस्टर हाती देण्यात आले होते. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनीनीलयबद्ध पद्धतीने लेझीमवर नृत्य सादर केले. खांदा कॉलनीतील वीर हॉस्पिटलपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. श्री कृपा हॉल ते अष्टविनायक हॉस्पिटल पेट्रोल पंप व शेवटी सिडको जलकुंभ सेक्टर 11 जवळ रॅलीची सांगता झाली.
या रॅलीस संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर, प्रमोद वालेकर, चारुदत्त भगत, व्ही. सी. म्हात्रे, गुरुदेवसिंग कोहली, माधुरी कोडुरु, शैला बंदसोडे, सतीश माटेकर, संजय होन शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विदयार्थी व पालकवर्ग आदि सहभागी झाले होते.







