। खांब-रोहा । वार्ताहर ।
सुएसोचे द.ग.तटकरे माध्य.व ज्युनिअर कॉलेज कोलाडचे आंबेवाडी येथे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने सात दिवसासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सुरेश महाबळे, जगन्नाथ धनावडे, ज्ञानेश्वरी लोखंडे, प्रितम पाटील, राकेश लोखंडे, मारुती लोखंडे, बाळा महाबळे, प्रा. येरुणकर, देशमुख , डी. आर पाटील,घोणे, सौ. तटकरे, सौ.पठाण, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री जाडकर यांनी केली, सूत्रसंचालन भूषण महाडिक यांनी केले. तर आभार एन एस एस विद्यार्थी स्वयंसेवक प्रमुख वर्धन ऐवळे यांनी केले.