‘एलजीबीटीक्यूआयए’साठी अ‍ॅक्सिस वचनबद्ध

कर्मचारी, ग्राहकांसाठी नवे धोरण जाहीर
। अलिबाग । वर्षा मेहता ।
अ‍ॅक्सिस बँकेने अलीकडेच एलजीबीटीक्यूआयए+ (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्स, क्वीअर, इंटरसेक्स, एसेक्सुअल, इतर) समुदायातील आपल्या कर्मचार्‍यांसाठी आणि ग्राहकांसाठी नवे धोरण जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समान भावना आणि बँकेच्या व्यापक ईएसजीसंबंधित वचनबद्धतेला अनुसरून, त्याने ग्राहकांसाठी विविधता, समानता आणि समावेशन स्वीकारणारी धोरणे आणि पद्धतींची एक चार्टर सुरू केली आहे.
हा उपक्रम पर्यावरण, सामाजिक आणि शासन (ईएसजी) वचनबद्धतेचा एक भाग, विविधता, समानता आणि समावेशनाला प्रोत्साहन आणि अंमलबजावणी करण्यास मदत करेल, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत एलजीबीटीक्यूआयएच्या निष्ठा निशांत यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, आता काळ बदलला आहे. लोक एलजीबीटीक्यूआयए + समुदायाच्या लोकांना स्वीकारण्यास, त्यांना समजून घेण्यास इच्छुक आहेत. अ‍ॅक्सिस बँकेने घेतलेला निर्णय समाजात आदर्श निर्माण करणारा आहे. आमच्या क्वीर समुदायाच्या अनुभवात अ‍ॅक्सिस बँकेने खरोखरच मोठा बदल निर्माण केला आहे. सर्वसमावेशक होण्यासाठी त्यांचे विचार आणि हेतू हा एक बदल आहे, ज्याने समाजात वास्तविक सकारात्मक प्रभाव आणला आहे.

बँकेने घेतलेला निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे एलजीबीटीक्यूआयए समुदायातील अनेकांच्या आयुष्यात बदल होतील. आम्ही अशा अधिक उपक्रमांचा अनुभव घेण्यास उत्सुक आहोत. ज्यामुळे समाजातही सकारात्मक प्रभाव पडेल.
निष्ठा निशांत, वैज्ञानिक अधिकारी, लिलाक इनसाइट्स

Exit mobile version