पीएनपी कॉलेजला नॅकचे बी ग्रेडचे मांनाकन

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला नॅकचे मांनाकन मिळाले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी महाविद्यालयाचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन करून चांगले दर्जेदार महाविद्यालय असल्याचे जाहीर करून बी ग्रेडचे मांनाकन दिले आहे. तसेच, नॅक समितीने महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांविषयी समाधान व्यक्त केले आहे.

मागील 20 वर्षात या संस्थेसाठी रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, भूगोल त्याचप्रमाणे संपूर्ण वातानुकूलित आणि 84 कॉम्प्युटर स्टेशन असलेली मेगा कॉम्प्युटर सायन्स लॅब अशा या अत्याधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळांसाठी नॅक समितीने चांगला अभिप्राय नोंदविला. वनस्पतीशास्त्र विभागाने पुढाकार घेऊन तयार केलेले वनस्पती उद्यान आणि सेंद्रिय खत प्रकल्प निर्मिती उपक्रमाला समितीने विशेष प्रतिसाद देत सूचनाही केल्या. विशेष कागदपत्र आणि ऑनलाईन दाखले विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या कक्षेतच मिळावे यासाठी पीएनपी इ-सुविधा केंद्राचे त्यांनी विशेष कौतुक केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सर्वात मोठे व्यासपीठ मिळवून देणारा प्रभाविष्कार हा महाविद्यालया बरोबरच संपूर्ण अलिबागकरांसाठी राबवलेला मोठा उपक्रम असतो. तसेच, प्रतिवर्षी मराठी विभाग मराठी भाषा दिनी काढत असलेला विशेषंकाची नोंद नॅक समितीने केली आहे. यामुळे आता पीएनपी संकुलामध्ये अनेक नवे कोर्सेस सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे, मुलांना एकाच संकुलात आता वेगवेगळे बाहेरील उपयुक्त कोर्स उपलब्ध होतील.

अलिबाग वेश्वी पीएनपी शैक्षणिक संकुल महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. संस्थेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, खजिनदार नृपाल पाटील यांच्या मार्गदशनाखाली प्राचार्य म्हणून डॉ. ओमकार पोटे यांच्याकडे कार्यभार आहे. प्राचार्य आणि प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दिवसरात्र घेतलेल्या परिश्रमाला योग्य न्याय मिळाला आहे. महाविद्यालयाचे संचालक प्रा. विक्रांत वार्डे यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे माजी आय.क्यू.एस.सी. विभाग प्रमुख स्वर्गीय नितेश अगरवाल आणि कार्यरत विभाग प्रमुख प्रा. केतकी पाटील यांनी सुद्धा विशेष मेहनत घेतली. नॅक समितीमध्ये पुढील सदस्यांनी अनुक्रमे नॅकच्या सात क्रायटेरियाचे नेतृत्व केले. प्रा. नूतन पाटील, प्रा. कैलाससिंह राजपूत, प्रा. पूजा पाटील, प्रा. मिलिंद घाडगे, प्रा. प्रिती पाटील, प्रा. दिनेश पाटील, प्रा. पूजा म्हात्रे या टीमने नॅकसाठी अथक परिश्रम केले. कला विभाग प्रमुख प्रा. नम्रता पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे आणि विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुजित पाटील यांनी वेळोवेळी आपापल्या विभागातील विषयांना न्याय देत सर्व शिक्षकांकडून कागदपत्रांचे काम पूर्ण केले. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. कांचन म्हात्रे आणि कार्यालयीन विभाग प्रमुख प्रथमेश पाटील आणि सुबोध पाटील यांनी नॅकसाठी कार्यालयीन कामकाजाची पूर्तता केली. वरिष्ठ महाविद्यालय बरोबरच कनिष्ठ महाविद्यालयाने सुद्धा नॅक कामकाजासाठी हातभार लावला. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील, प्रा. निशिकांत कोळसे, प्रा. तेजेश म्हात्रे, प्रा. आशिष पाटील, प्रा. गणेश पाटील, प्रा. हितेश पाटील, प्रा. प्रियांका पाटील यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले. अनेक आजी आणि माजी विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पीएनपी संस्थेसाठी हा मोठा बहुमान असून आमच्या महाविद्यालयाला नॅक बी ग्रेड मानांकन मिळाले आहे. पीएनपी संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा कायम राखण्या सोबत पीएनपी कॉलेज आधुनिक करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.

डॉ. ओमकार पोटे (प्र. प्राचार्य)
Exit mobile version