| अलिबाग | प्रतिनिधी |
पीएनपी एज्युकेशन सोसायटी, पीएनपी स्किल डिपार्टमेंटच्या माध्यमातून ग्राफिक्स डिझाईन आणि डिजिटल मार्केटिंग हा कोर्स सोमवारपासून सुर करण्यात आला. सदर प्रशिक्षण दोन बॅचमध्ये म्हणजे सकाळी ११ ते १२.३० आणि दुसरी बॅच दुपारी १२.३० ते २ अशा वेळेमध्ये दिले जात आहे. यामध्ये विद्यार्थी, उद्योजिका तसेच गृहीणींचा मोठा सहभाग आहे.
सुरूवातीस कॉम्प्युटर हाताळणे तसेच फोटोशॉप, कोरल ड्रा, ‘प्रिमियर प्रो’ची माहिती देण्यात येत आहे. सदर कोर्स तीन महिन्यांकरिता डिझाईन केलेला असून वैयक्तिक मार्गदर्शन, प्रत्येकाला स्वतंत्र कॉम्प्युटर हाताळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन दिले जात आहे. ज्यांना या प्रशिक्षणात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी अधिक महितीकरिता 9403094130 / 9226987356 / 9881041000 या नंबरवर संपर्क साधावा.