बाबरने मोडला धोनीचा विक्रम

| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |

बाबर आझमने टी-20 विश्वचषकामध्ये कर्णधार म्हणून 549 धावा केल्या आहेत. त्याने अवघ्या 17 डावांत या धावा केल्या आहेत. याआधी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता, त्याने 29 डावात 529 धावा केल्या होत्या. तसेच, टी-20 विश्वचषकामध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू बाबर आझमसह 529 धावा एमएस धोनी (29 डाव), 527 धावा केन विल्यमसन (19 डाव), 360 धावा एम. जयवर्धने (11 डाव), 352 धावा ग्रॅम स्मिथ (16 डाव).

Exit mobile version