| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषक सुपर-8 च्या लढती निश्चित झाल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाने आणि अमेरिकने ‘अ’ गटातून सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. ‘अ’ गटात असलेल्या पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर जावे लागले आहे. पाकिस्तानला अखेरच्या सामन्यात आयरलँड विरूध्द विजय मिळवण्यासठी संघर्ष करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. टी-20 वर्ल्ड कपमधून पहिल्या फेरीतून बाहेर पडलेल्या पाकिस्तानबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानच्या संघात एकता नव्हती. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात संवाद नव्हता, असे दावे केले जात आहेत. काही जणांना बाबर आझमला पाकिस्तानचे कर्णधार पद सोडण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख के. श्रीकांत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बाबर आझमने टी-20 क्रिकेट खेळू नये, असा कठोर सल्ला के. श्रीकांत यांनी दिला आहे.
बाबर आझम एक चांगला कसोटी क्रिकेटर असेल. मात्र, मला वाटते की त्याने टी-20 क्रिकेट खेळू नये. भारतीय संघाचे माजी निवड समिती प्रमुख असे श्रीकांत यांनी असा सल्ला दिला आहे. टी-20 क्रिकेट सारख्या वेगवान फॉरमॅटमध्ये तुम्ही नेहमी टुक टुक करु शकत नाही, असे श्रीकांत हे म्हणाले. पुढे म्हणाले की तुम्ही आकड्यांबाबत जेव्हा बोलता त्यावेळी ते बाबर विराट कोहली आणि रोहित शर्माने 4 हजार धावा केल्याचे सांगतात. मात्र, बाबर आझमचा स्ट्राईक रेट 112-115 इतका आहे. तुम्ही कुणाबाबत बोलताय, अस सवाल के. श्रीकांत यांनी केला.
पाकिस्तान सुपर 8 मधून बाहेर पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये तर भारताकडून 6 धावांनी पराभव स्वीकारला होता. यानंतरही पाकिस्तानच्या सुपर 8 च्या आशा कायम होत्या. मात्र, आयरलँड विरुद्ध अमेरिका मॅच पावसानं रद्द झाली. त्यामुळे अमेरिकेला फायदा मिळाला आणि ते सुपर 8 मध्ये गेले. तर, कॅनडा आणि आयरलँडला पराभूत करुनही पाकिस्तान क्रिकेट संघाला घरचा रस्ता धरावा लागला.