नविन वाघविरा अंगणवाडीत ओटभरण कार्यक्रम संपन्न

कुसुंबळे | वार्ताहर |

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या चिखली विभागातील नविन वाघविरा अंगणवाडीत नुकताच पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर महिलांचा ओटभरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अंगणवाडी सेविका जिविता पाटील, धन्यता निळकर, आशा सेविका सरिता पाटील, मदतनीस सुचिता पाटील व उज्ज्वला पाटील, शर्मिला पाटील, अरुण पाटील, संकेत पाटील इ. उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आपापल्या कार्यक्षेत्रातील गरोदर, स्तनदा महिला, मुले व किशोरी मुली यांना घेवून दरमहा अंगणवाडी स्तरावर सीबीई कार्यक्रम घेतला जातो. त्याअंतर्गत गरोदर माता सुनिता रवींद्र पाटील या महिलेची सातव्या महिन्यात अंगणवाडीत ओटी भरण्यात आली. यावेळी अंगणवाडी सेविका जिविता पाटील यांनी गरोदर पणात घ्यावयाची काळजी, आहार व बाळंतपणाची पूर्व तयारी यावर मार्गदर्शन केले. तसेच यावेळी सदरील महिलेची वजन व उंची घेण्यात आली. सदरील उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, विस्तार अधिकारी अपर्णा शिंदे यांनी कौतुक केले.

Exit mobile version