| नागोठणे | वार्ताहर |
रोटरी क्लब ऑफ रोहा आणि रोटरी ग्लोबल ग्रँड यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील सुमारे 35 प्राथमिक आरोग्य केंद्रात बेबी वॉर्मर मशीन इन्व्हर्टर सुविधा सहित भेट स्वरूपात देण्याचा प्रारंभ नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. नागोठणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाईस टके, रोहा रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर,पुणे येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे, नागोठणे रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मोदी, राजेंद्र पोकळे, डॉ. जी. एस.कोकणे, डॉ. रोहिदास शेळके, डॉ.अभिषक शहासने, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट,बाळासाहेब टके, आनंद लाड, श्रेया कुंटे, प्रियंका पिंपळे, गौतम जैन, सोष्टे, उल्हास शिंदे तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.