जांभुळपाडा-भेलीव मार्गाची दुरवस्था

। राबगाव/पाली । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा-वासुंडे ते भेलीव रस्त्याची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणार्‍या या मार्गावरून मानखोरे विभागासह भेळीवच्या टोकापर्यंतच्या सुमारे 10 ते 15 गावांच्या नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील विशेषतः जांभुळपाडा, करचुंड, वासुंडे, भेलीव याठिकाणी रस्त्याची खडी जाऊन मोठमोठे खड्डे पडून त्यांना तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. याच मार्गावर किनीशा प्रोजेक्टच्या समोरील नाल्यावर मोठे भगदाड पडले असून, तेथून वाहनचालकांसह प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. तरी, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून मार्ग सुस्थितीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जांभुळपाडा-वासुंडे-भेलीव मार्गावरून दररोज हजारो प्रवासी, पादचार्‍यांसह शाळेच्या बसमधून येणार्‍या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

– प्रणीता ठाकूर, प्रवासी
Exit mobile version