गेल कंपनी गेटसमोरील रस्त्याची दुरावस्था

| रेवदंडा | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील उसर गेल इंडिया कंपनी गेटसमोरील रस्त्याची दुरावस्था झाली असून संबंधितांच्या दुर्लक्षाने प्रवासी वर्गाला आणि वाहन चालकांना रस्ता पार करणे जिकरीचे बनले आहे.

अलिबाग-रोहा मुख्य रस्त्याला गेल कंपनी गेटसमोर खड्डेच खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचून तेथे डबके तयार झाले आहे. या रस्त्यावरून दररोज लहान वाहनांची वर्दळ असते. कंपनीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनाची संख्या सुध्दा मोठी आहे. या रस्त्याची दुरावस्था फारच बिकट असून येथून मोटरसायकल, रिक्षा, व मिनीडोर या वाहनांना सुध्दा रस्ता शोधूनच वाहन पुढे न्यावे लागत आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी येथे माती टाकण्यात आली आहे. पाऊस पडल्याने हा रस्ता या मातीने चिखलमय झाला आहे. या चिखलातून वाट काढणे पादचाऱ्याला सुद्धा अडचणीचे ठरत आहे. त्वरीत या रस्त्याचेनूतनीकरण किंवा दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version