बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन गुरुवारी होणार

चित्रलेखा पाटील यांची वचनपूर्ती

  । अलिबाग । प्रतिनिधी ।

बॅडमिंटन खेळातून ग्रामीण भागातील तरुणांचे आरोग्य चांगले राहवे. खेळाडूंना यातून एक चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या  प्रयत्नाने आंबेपूरमध्ये बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात आले आहे. कोर्टचा उद्धाटन सोहळा गुरुवारी 0 31 ऑगस्ट  रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.  आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.

यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ.पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस  अ‍ॅड. आस्वाद पाटील,  अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील,  जि.प.सभापती  चित्रा पाटील, माजी सदस्या भावना पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप युवा नेेते सवाई पाटील, आंबेपूरच्या सरपंच सुमन पाटील, पं.स.चे माजी सभापती प्रमोद ठाकूर, बाळु पाटील, सुगंधा पाटील, विद्या म्हात्रे, भारती थळे, तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी उपसभापती प्रकाश पाटील,  माजी सदस्य कुंदा गावंड, सुधीर थळे, शेकाप महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंकज पंडीत आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 बॅडमिंटन कोर्टचा फायदा परिसरातील, खारेपाटातील अनेकांना होणार आहे. यातून एक चांगले खेळाडू घडण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरात बॅडमिंटन खेळाडूंसाठी हे कोर्ट एक वरदान ठरणार आहे.

चित्रलेखा पाटील, महिला आघाडीप्रमुख
Exit mobile version