बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

मुंबई | प्रतिनिधी |
अर्जुन पुरस्कार विजेते माजी बॅडमिंटनपटू आणि 1960 च्या दशकांत भारतीय क्रीडा क्षेत्राला उंचीवर नेणारे नंदू नाटेकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 88 वर्षाचे होते. मूळचे सांगलीचे असणार्‍या नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव आंतराष्ट्रीय स्तरावर नेलं होतं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा मिळवणारे ते भारततील पहिले खेळाडू होते. तसेच भारत सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या अर्जुन पुरस्काराचे ते पहिले मानकरी ठरले होते.
नंदू नाटेकर यांनी अन्य खेळांमध्येही प्राविण्य मिळवलं होतं. क्रिकेट, टेनिसमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर देखील चांगली कामगिरी केली होती. भारतीय क्रीडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणार्‍यांमध्ये सर्वात आधी नंदू नाटेकर यांच नाव येते.
ऑल इग्लंड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत त्यांनी क्वार्टर फायनल पर्यंत मजल मारली होती. 1960 च्या दशकात जाहिरात क्षेत्रातही त्यांनी मोठी मजल मारली होती. केसांना लावायच्या एका हेअर क्रीमची पहिली जाहिरात करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
नंदू नाटेकर यांनी वयाच्या 20 व्या वर्षी 1953 मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बरीच मोठी कामगिरी केली होती. 1954 मध्ये, त्यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर ते या स्पर्धेत कधीही खेळले नाहीत. या स्पर्धेत तो पहिलाच आणि शेवटचा सामना ते खेळले. पण त्यांनी या स्पर्धेत व्हेटेरन्स प्रकारात खेळला आणि 1980, 1981 मध्ये दुहेरी प्रकार जिंकला आणि 1982 मध्ये दुसरे स्थान मिळविले.
थॉमस चषक मध्ये यश
1951 ते 1963 या काळात थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचा भाग होते आणि 16 पैकी 12 सामने जिंकण्यात यशस्वी झाले होते. यावरून एकेरी स्पर्धांमध्ये त्यांच्यां खेळाचा अंदाज बांधला जाऊ शकतो. दुहेरी प्रकारात त्यांनी 16 पैकी आठ सामने जिंकले आणि 1959, 1961 आणि 1963 मध्ये ते संघाचे कर्णधारही होते. त्यांनी पुरुष एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीत राष्ट्रीय स्पर्धाही जिंकल्या होत्या. 1956 मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित सेलंगोर आंतरराष्ट्रीय स्पर्धाही त्यांनी जिंकली होती.

Exit mobile version