। खारेपाट । वार्ताहर ।
उद्योजक अमित नाईक पुरस्कृत खारेपाट प्रिमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धेत बहिरिदेव विजेता ठरला. या संघास भव्य ट्रॅाफी व 75 हजार रुपयाचे पारितोषिक तर उपविजेता सचिन मित्र मंडळ शिवबा संघास 50 हजार रुपये व ट्रॅाफी, तृतीय क्रमांक स्मरणिका नवखार संघास 25 हजार रुपये व ट्रॅाफी व चतुर्थ संघ बि.सी.सी सारळ यांना 25 हजार व ट्रॅाफी देण्यात आली. तसेच स्पर्धत उत्कृष्ट गोलदांज मनिश पाटील चिंचवली यास वॉशिंग मशिन व उत्कृष्ट फलंदाज विशाल राणे या खेळाडूला वॉशिंग मशिन बक्षिस स्वरूपात स्पर्धेचे आयोजक अमित नाईक व अन्य मान्यवरांच्या हास्ते देण्यात आले.
यावेळी रेवस सरपंच मच्छींद्र पाटील, सारळ उपसंरपंच संजय पाटील, ज. गो. पाटील, सारळ ग्रा.पं. सुशिल पाटील, विजय साळुंके, सुनिल म्हात्रे, सिंधु म्हात्रे, रमेश मोकळ, शंकर पाटील, धनजंय मोकल, निशिकांत मोकळ, मानी सरपंच विद्याधर ठाकूर, सत्यवान ठाकूर, उमेश गावंड, शंकर मोकळ, स्टेज डेकोरेटर सातमकर, कॉमेंट्रडे संदिप जगे, आकाश मांजरेकर, कपिल ठाकूर, निलेश ठाकूर आदी मान्यवर हजर होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन खा.सुनिल तटकरे यांचा हस्ते करण्यात आले होते. स्पर्धत खारेपाटातील 16 नामवंत संघ सहभागी झाले होते. स्पर्धा सलग 6 दिवस सुसज्य अशा बालवीर मैदानावर खेळविण्यात आल्या. भव्य स्टेज व प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी होती.