गौतमी पाटीलला जामीन मंजूर

| अहमदनगर | वृत्तसंस्था |

नृत्यांगाना गौतमी पाटीलला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने गौतमीला जामीन मंजूर केला आहे. विनापरवाना कार्यक्रम करुन नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता न्यायालयाने अटी आणि शर्थींसह जामीन मंजूर केला आहे. मागच्या वर्षी गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाईपलाईन रोडवर पार पडला होता. या कार्यक्रमासाठी तिने संमती घेतली नव्हती. या प्रकरणावरुन गौतमी पाटीलवर पोलिसांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आता गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे. मागील वर्षी गणपती उत्सवा दरम्यान रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला होता. यानंतर गौतमी पाटील , तिचे मॅनेजर आणि गणपती मंडळाचे अध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गौतमी पाटील अहमदनगर येथील न्यायालयात हजर झाली होती. त्यानंतर तिला अटी शर्थींसह जामीन मंजूर केला. गणेशोत्सवाच्या काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतरही गौतमीचा कार्यक्रम झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Exit mobile version