प्रकल्पग्रस्त आंदोलकांना जामीन मंजूर

नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील रिलायन्स कंपनी (पूर्वीची आयपीसीएल) व्यवस्थापनाच्या विरोधात दि. 15 रोजी विविध मागण्यासाठी नागोठणे ते चोळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांकडून छेडण्यात आलेल्या गेट बंद आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रिलायन्स कंपनीच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळच असलेल्या कडसुरे गावाच्या बस थांब्याच्या ठिकाणी ताब्यात घेतले होते. या आंदोलकांना मंगळवारी रोहा येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र नंतर लगेचच या 40 प्रकल्पग्रस्त आंदोलकांना जामीन मंजूर करण्यात आला.

Exit mobile version