। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासळ यांनी रायगड जिल्हा आणि सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने स्व.भाऊ धोंडू खाडे स्मृती चषक 2022 जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन दि.30 एप्रिल रोजी रासळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना श्री गणेश कासु विरुद्ध नवयुवक धाटाव या दोन संघांमध्ये झाला. या अटीतटीच्या अंतिम लढतीत श्री गणेश कासु हा संघ विजय झाला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक कासु या संघास रोख रक्कम 21 हजार व चषक, द्वितीय क्रमांक नवयुवक धाटाव 15 हजार व चषक, तृतीय क्रमांक नाथ भैरव झाप 7 हजार व चषक, चतुर्थ क्रमांक भैरीनाथ क्रीडा मंडळ वावे 7 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वात्कृष्ट खेळाडू प्रेषित बोरकर, उत्कृष्ट चढाई करणारा अजय मोरे (धाटाव) तर उत्कृष्ट पक्कड प्रणय रटाटे (झाप) यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासळचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळाच्या हस्ते करण्यात आले.