। गडब । वार्ताहर ।
येळंबादेवी क्रीडा मंडळ आमटेम आयोजित कबड्डी स्पर्धेत बाळनंद कासू संघाने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा संर्पक प्रमुख विष्णुभाई पाटील, समन्वयक नरेश गांवड, विभाग प्रमुख गजानन मोकल, पेण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण गावंड, भारतीय सैनिक, युवराज तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते सचिन तांबोळी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलात असलेले सैनिक युवराज तांबोळी यांचा सत्कार शिवसेनेचे रायगड जिल्हा संर्पक प्रमुख विष्णु पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर कबड्डी खेळाडूंना विष्णु पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक बालनंद कासू, द्वितीय क्रमांक श्री गावदेवी मुंढाणी, तृतीय क्रमांक अरुण पाटणी, चतुर्थ क्रमांक वादळ सलिंदे यांनी पटकाविला. स्पर्धेचे पारितोषक वितरण भारतीय सैनिक युवराज तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते सचिन तांबोळी, किशोर गायकर, गजानन मोकल, लक्ष्मण तांबोळी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.