खासदार बारणेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान येथून नेरळ येथे येणारी मिनीट्रेन मे 2019 मध्ये अमन लॉज स्थानकाजवळ नॅरोगेज रुळावरून घसरली होती. त्या आठवड्यात सलग दोनदा त्याच जागेवर मिनीट्रेन रुळावरून खाली उतरली होती. त्यानांतर मध्य रेल्वे प्रशासनाने मिनीट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हि बंद पडलेली मिनीट्रेन आपल्याच पाठपुराव्यामुळे सुरु झाली, असा पुनरुच्चार माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे लेखी कागदपत्रे पुढे करीत हे जाहीर केले. तर, त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपणच बंद पडलेली मिनीट्रेन सुरु केली असे सांगत असल्याने खासदार बारणे यांच्या कार्यपद्धतीवर संभ्रम निर्माण झाला आहे.
जून 2019 मध्ये नेरळ-माथेरान-नेरळ प्रवासी सेवा बंद झाली आणि यावर्षीच्या विक्रमी पावसात माथेरान-अमन लॉज ही शटल सेवा जुलै महिन्यापासून बंद पडली. मिनीट्रेनच्या 21 किलोमीटर नॅरोगेज मार्गावर मोठ्या प्रमाणात भूस्खनन होऊन नॅरोगेजचा मार्ग वाहून गेला. यामुळे मिनीट्रेनची शटलसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर माथेरान मधील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी माहिती अधिकार यांच्या माधयमातून अपघाताचे कारण जाणून घेतले आणि त्यात मध्य रेल्वेचे सी अँड डब्लू यांच्या विभागात दोष असल्याचे ठाम मत व्यक्त केले होते. त्यांनतर जनार्दन पार्टे यांनी पत्र पाठवून मिनीट्रेनच्या खाली असलेल्या नॅरोगेज असलेली लोखंडी स्लीपर बदली करण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने मान्य केल्याचा पार्टे यांचा दावा आहे. त्यांनतर नेरळ माथेरान मिनीट्रेन मार्गावरील 21 किलोमीटर अंतरातील 37500 स्लीपर बदलण्यात आले असल्याचा दावा जनार्दन पार्टे यांनी केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर कोणी काहीही बोलो, आदेश देउन ट्रेन सेवा चालू होत नाही, अशा शब्दांत पार्टे यांनी आपली बाजू मांडली आहे.
माथेरान येथे प्रचारासाठी आल्यानंतर विद्यमान खासदार यांनी बंद पडलेली मिनीट्रेन आपण सुरु केल्याचा दावा केला आहे. तसेच, चौक खालापूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत देखील खासदार बारणे यांच्याकडून त्याचा पुनरुच्चार करण्यात आला होता. मात्र, त्यानांतर माहिती अधिकार कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी मीडियावर बंद पडलेली मिनीट्रेन आपणच सुरु केली असा दावा केल्याने खासदार बारणे यांच्या कार्यपधतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.