। पाली/वाघोशी । वार्ताहर ।
परळी येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा बालआनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांनी स्टॉल मांडले होते. त्यात गुलाब जामून, भेळ, वडापाव, कच्च्या कैर्या, भाजीपाला, कलिंगड, सरबत असे वेगवेगळे खाऊंचे स्टॉल ठेवण्यात आले होते. त्यांची खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग सुद्धा उत्साहाने सहभागी झाला होता. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यापार, रोजगार, गणिती व्यवहाराची संकल्पना दृढ व्हावी आणि भविष्यातील विद्यार्थ्यांमध्ये लपलेले व्यवसाय गुण दिसावे, हा महत्त्वाचा उद्देश होता. हा कार्यक्रम केंद्रप्रमुख हाके यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असुन विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक सुहास भुस, शहानवाज शेख, विद्या शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली होती.