बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका

। मुंबई । वृत्तसंस्था ।

नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी पक्षाने दिलेल्या चुकीच्या एबी फॉर्मवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला आहे.

महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वादानं परमोच्च बिंदू गाठला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचं दिसून येतंय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता.

Exit mobile version