| कोलाड | प्रतिनिधी |
ईडा पिडा टळू दे, बलीचे राज्य येऊ दे, ही म्हण आता इतिहास जमा झाली आहे. तर एकेकाली रायगडची भाताचे कोठार म्हणून इतिहासात ओळख आहे. मात्र, त्याच रायगडातील बळीराजा सततच्या पावसामुळे पिकाला आलेल्या धानाची नुकसानी रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील शेतकऱ्यांची होत असल्याने तो हवालदिल होत चिंतेत पडला आहे.
असंख्ये शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील भात पीक अक्षरशः अवकाळी पावसात तद्नंतर मोसमी पावसामुळे पाणी साचून पिकाच्या मुळांना लागल्याने सडले, तर काही शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके जमिनीवर लोळत वाहून त्या धानाची नासाडी झाली आणि काहीवेळा पूर्णपणे कुजून शेतातच राहिली त्याचे तत्काल पंचनामे देखील वरीष्ठ पातळीवरून करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे केल्याचा प्रशासनानी दिलासा दिला. मात्र, त्याची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. तरी देखील बळीराजा या मोठ्या संकटाला झुंझ देत पुन्हा खरिपाच्या पेरणीसाठी उसनवारी करून सज्ज होऊन खरिपाची पेरणी केली तद्नंतर लागवड केली. भरमसाठ पावसात काहींची लागवडीस आलेले पेरणे रोप वाहून गेली ज्यांची वाचली त्यांनी लागवड केली.
पाऊस जरी भात पिकांना समाधानकारक पडला असला तरी आताच्या घडीला काही धान पिकला पीक देखील समाधानकारक आहे. त्याची कापणी येत्या आठ ते दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, मात्र वरुणराजाची विश्रांती मिळत नसल्याने तसेच तो सतत बरसत असल्याने शेतात पिकाला आलेले धान अथवा बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या मार्गावर असल्याने खांब देवकान्हे विभागासह तालुक्यातील शेतकरी बळीराजा मोठा चिंतेत सापडला आहे. त्यामुळे या परिस्थितीमुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आणि बळीराजाला मोठा फटका बसतो. धान पिकाला सततच्या पावसामुळे होणारे नुकसान हे शेतकऱ्यांची चिंता वाढल्याचे दिसत असून, धान पिकांसोबत फळ बागायत देखील तसेच नाचणी, वरी, तील यांच्या देखील पिकांना या पावसाचा जोरदार फटका बसत आहे. तर काही ठीक ठिकाणी जंगल भागातून रानटी डुकरांचा आणि वानरांचा हैदोस सुरू झाले असून, त्यात देखील काही शेतकऱ्यांचं धान लोदून चिखलात आडवे केले तो देखील मोठा मनस्ताप बळीराजाला बसला आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तळागाळातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.
सततच्या पावसामुळे विविध रोग आणि किडींचा (जसे की खोडकिडा, मावा, तुडतुडा) पांढऱ्या सीटोक्याचा प्रादुर्भाव वाढतो, ज्यामुळे पिकांचे आणखी मोठ्या नुकसान या तालुक्यात होते. आधुनिक तंत्र शेतात खूप ओलावा आणि पाणी साचल्याने भात कापणी यंत्रे चालू शकत नाहीत, त्यामुळे मजुरांशिवाय कापणी करणे कठीण होते. त्यात पिकांची नासाडी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो, कारण त्यांना उत्पादनाचा खर्चही निघत नाही. मजूर वेळेवर मिळत नाहीत त्याची देखील मजुरी वाढली आहे.
मुसळधार पावसामुळे तयार झालेले तसेच कापणीला आलेली भातपिके जमिनीवर आडवी पडतात. तर शेतात पाणी साचून राहत असल्याने भाताला आलेले धान कुजायला लागते. त्यामुळे प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.
डॉ मंगेश सानप
सदस्य कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तथा ग्रामीण शाखा रोहा.







