| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड पंचक्रोशी भागात भातपीक हे प्रमुख उत्पादन आहे. यंदा शेतीयुक्त पाऊस चांगला पडल्याने भातपिकाला हा पाऊस पोषक ठरला, त्यामुळे शेतातील भाताची सोनेरी रोपे आता डोलू लागली आहेत. यंदा भातपिकात वाढ होण्याची शक्यता असल्याने बळीराजा सुखावला आहे.
मुरूड तालुक्यात 3900 हेक्टर क्षेत्रात भातपिकासाठी लागवड केली जाते. यंदा त्यापैकी 3890 टक्के भातपिकांची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा प्रचंड तणावाखाली होता. दुबार पीक करायला लागतंय का, हा मोठा प्रश्न बळीराजासमोर होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात वरुणराजाने एवढी कृपादृष्टी दाखवल्याने शेतात पाणीच पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला. पडणारा पाऊस भातपिकाला पोषक ठरला. त्यामुळे भाताची सोनेरी रोपे तरारुन आली. ही सोनेरी रोपे वार्यावर डोलू लागली आहेत. मुरुड पंचक्रोशी भागात सर्रास शेतकरी आपल्या शेतात सुवर्णा, जया, चिंटू हे पीक घेतले जातो. जया व चिंटू पीक तयार झाले असून, जया पीक पुढील महिन्यात पूर्णतः तयार होईल. शिवारातील सोन्याने आपली भरभराट होईल, अशी आशा येथील शेतकरी करीत आहे.