ग्रामीण भागात औतावरची गीतं सुरु
| पातळगंगा | वार्ताहर |
बर्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने खालापूर तालुका ओलाचिंब झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत आहे. मृग नक्षत्रात पावसाने शेतकर्यांना हुलकावणी दिली होती. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत होते. आद्रा नक्षत्राला सुरुवात होताच वरुणराजाने पातळगंगा परिसरात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. बिपरजॅाय वादळामुळे यंदा पावसाला दाखल होण्यास विलंब झाला आहे. पाऊस नसल्याने शेतकर्यांनी भात पेरणी केली होती. त्यामुळे पावसाअभावी दुबार बियाने खरेदीचे संकट शेतकर्यावर आले होते. त्यामुळे मृग नक्षत्रात पाऊस येईल, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती.
मात्र, मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडाच गेल्याने शेतकर्यांनी केलेल्या धूळपेरणीसाठी पावसाचे आगमन गरजेचे झाले होते. परिणामी, शेतकर्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. गेले दोन ते तीन आठवडे पावसाचे अगमन होत असल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र भात लागवड ची कामे खोळंबली आहे. मात्र पाऊस क्षणभर विश्रांती घेत असल्यामुळे आता बळीराजाला जाणवू लागले आहे. पाऊस येत असुन आणी लगेच जात असल्याने या वेळेत शेतीची कामे करण्यास शेतकऱ्याची लगबग सुरु झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात अग्रेसर असलेले लाकडी नांगर घेवून शेतात काम करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. सकाळ -सायंकाळ हा परिसर बळीराजाच्या औताच्या गीतांच्या मैफिलीने रंगून जात आहे. रानपाखरांच्या गाणार्या स्वर अन बळीराजाची शाहीर गीते, सर्जा-राजाच्या गळ्यातील घुंगारांचा आवाज या. मंजूळ स्वरांनी रानोमाळ संगीतमय झाला असून शेतीची कामे करण्यास बळीराजा मग्न झाला आहे.
शेतांकडे पावले
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या; मात्र त्यानंतर पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत होते. एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे वाढलेल्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होत होती. अशातच दीर्घ उसंतीनंतर पावसाचे आगमन झाले आहे.







