बाळू गायकवाड यांचा वाढदिवस साजरा

। सोगाव । वार्ताहर ।

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांचा गुरुवारी (दि.6) 76 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बाळू गायकवाड यांचा 76 वा वाढदिवस त्यांच्या मुलांनी जुन्या मित्रपरिवारांच्या व कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत साजरा केला. यावेळी भक्तिमय मैफिलीच्या वातावरणात त्यांच्या मित्रांनी व कुटुंबातील इतर सदस्यांनी भावुक होत आपल्या बाबांना शतायुषी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, उमेश ठाकूर, अशोक म्हात्रे, धनाजी जोशी, दत्तात्रेय पाटील, शरद आमले, विकास जाधव, प्रमोद जाधव, विद्याधर दांडेकर, भंडारी, गंगाधर नाखवा, अरुण कोळी, ज्ञानेश्‍वर नाखवा, बाबू, मंगेश आमले, राजू शिंदे, नंदू कर्वे, उमाकांत नार्वेकर, मेघनाथ पाटील व इतर मित्रपरिवारांसह संदेश पाटील, डॉ. किरण शेट्ये, आसिफ मलिक, निलेश उतेकर, ओंकार आमले, नदीम आत्तार, प्रदीप पाटील, विजय मोरे, सुदेश सावंत, विजय आमले व इतर पिंट्या गायकवाड मित्रमंडळाचे कार्यकर्ते व बाळू गायकवाड यांच्या कुटुंबातील इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version