बांबू लागवडीचे प्रशिक्षण शिबीर

। पाली । वार्ताहर ।

रा.जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्याजित बडे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याज बांबू क्षेत्रात वाढ व्हावी व शेतकरी बांधवांना प्रगतिशील बांबू लागवडीचे मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे एक दिवसीय बांबू लागवडीचे प्रशिक्षण घेण्यात आले. हे प्रशिक्षण शिबीर सुधागड तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी बांबू विश्‍वचे संचालक सचिन टेके यांच्या ढोकशेत परळी येथील शेतावर संपन्न झाले.

यावेळी सचिन टेके यांनी त्यांच्या 4 हेक्टर क्षेत्रावर 35 वेगवेगळया बांबू वाणांची लागवड केली आहे. त्यांनी बांबू लागवडीची शास्त्रशुद्ध माहिती दिली. बांबू लागवडीसाठी लागणारी जमीन, जमीनीची मशागत, बियाणे, बियाण्यांचे प्रकार इत्यादीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्याजित बडे, सुधागड गटविकास अधिकारी लता मोहिते, कृषीविकास अधिकारी पवनकुमार नजन, जिल्हा कृषि आधिकारी आकाश यादव, राजेश घरत, मिलिंद चौधरी, विस्तार आधिकारी मुकेश कांबळे, मिलींद देवकर व अशोक मारकड आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version