उन्हाच्या तीव्रतेने केळीच्या बागा सुकल्या

| खांंब | वार्ताहर |

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत चालल्या असून या तीव्र झळांनी केळीच्या बागा सुकू लागल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या मानाने या वर्षाचा उन्हाळा हा अधिकच तीव्र स्वरूपाचा असल्याने मानवासह मानवेतर सजीव सृष्टीवरही यांचा चांगलाच दुष्परिणाम जाणवू लागला आहे. अति पाणी लागणारी झाडे अक्षरक्ष: सुकली आहेत. तर, अतिशय नाजूक खोड असलेली व जास्त पाण्याची गरज असलेली केळीची झाडे सुकू लागली आहेत. केळीची झाडे सुकू लागल्याने केळी बागायतदार यांना याचा चांगलाच फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.

केळीच्या बागा सुकल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे फारच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केळी हे फळ बारमही पिकणारे व बारमही खाल्ले जात असल्याने केळींना सर्वच ऋतूंमध्ये मोठी मागणी असते. मे महिन्यात तर ठिकठिकाणी असणारे लग्न समारंभ अन्य कार्यक्रमात केळीच्या फळांना विशेष मागणी असते. परंतु, या वर्षीच्या अती उष्णतेने केळीची झाडेच उन्मळून पडल्याने केळी बागायतदार शेतकरी वर्गाची पुरती निराशा झाली आहे.

Exit mobile version