अलिबागमध्ये सापडली धुळ नागीण

| अलिबाग | प्रतिनिधी |

दोन दिवसांपूर्वी अलिबाग मधील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या गाडीतून एक साप बाहेर पडला. लोकवस्तीच्या ठिकाणी साप अथवा अन्य वन्यप्राणी आढळल्यास वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबागचे सक्रिय कार्यकर्ते त्यांची सुखरूप सुटका करण्याचे काम गेले चार वर्षे करत आहेत. पंपावरील कर्मचाऱ्यांनी समीर पालकर ह्यांना सदर घटना कळवताच समीर पालकर त्वरित घटना स्थळी पोहोचले आणि त्या सापास सुरक्षितपणे पकडले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की हा साप बँडेड रेसर ह्या जातीचा आहे. हा साप अलिबाग शहराच्या आसपास सापडत नाही. मराठीत ह्याला धूळ नागीण असे म्हणतात. कोरड्या रेताड आणि मोकळ्या माळरानात सापडणारा हा साप खुपसा नागासारखा दिसतो. सरडे, उंदीर आणि लहान पक्षी खाणारा हा साप चुकून गाडीत शिरल्याने अलिबाग मध्ये मिळाला. वाईल्ड लाईफ वॉरियर्सचे संस्थापक आणि वन्यजीव अभ्यासक डॉ. प्रसाद दाभोळकर ह्यांनी नमूद केले. सदर सापाबद्दल वनविभागाला सूचित करून त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूपपणे सोडण्यात आले.

Exit mobile version