। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सोशल मिडियावर अनेकदा बुट, स्वच्छतागृह, घरात तसेच गाडीमध्ये साप गेल्याचे अनेक व्हीडीओ (https://www.youtube.com/shorts/ubHjhsKYmL4) व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. परंतु, खोपोलीत प्रत्यक्षात टीव्हीएस एंटॉर्क १२५ गाडीत साप घुसल्याचे पहायला मिळाले. गाडीत साप असल्याचे पाहून चालकाला चांगलाचा घाम फुटला होता. याबाबत माहिती मिळताच सर्पमित्र अमोल ठकेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गाडीतून सापाला बाहेर काढले. हा साप धामण जातीचा बिनविषारी साप होता. सापाला गाडीतून बाहेर काढल्यानंतर मोटारसायकल मालकाने सुटकेचा निःश्वास सोडला.