बांगलादेशने जाहीर केला कसोटी संघ

| बांगलादेश | वृत्तसंस्था |

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि आज 16 सदस्यीय संघ जाहीर केला गेला. बांगलादेशने अनकॅप्ड फलंदाज जाकर अली अनिकचा संघात समावेश केला आहे, तर वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम याला दुखापतीमुळे या मालिकेत खेळता येणार नाही.

बांगलादेश कसोटी संघ : 
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली अनिक
भारतीय संघ : 
(पहिल्या कसोटीसाठी) - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

पाकिस्तान दौऱ्यावर वेगवान गोलंदाज नाहिद राणा चमकला होता. या 21 वर्षीय गोलंदाजाने भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी मोठे भाष्य केले आहे. बांगलादेश क्रिकेटने एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो म्हणाला, ‘भारताविरूद्धच्या मालिकेसाठी आम्ही सज्ज आहोत. सरावालाही सुरुवात केली आहे. जेवढी जास्त आम्ही तयारी करून तेवढे जास्त आम्ही सामन्यांदरम्यान आमच्या योजनांची अंमलबजावणी करू. भारत एक चांगला संघ आहे, पण जो संघ चांगला खेळेल, तो जिंकतो. आम्ही आता तिथे जाऊन बाकी गोष्टी पाहू.’ राणाने पदार्पणातही श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याच्या गतीने प्रभावित केले होते. त्यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्धही दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या डावात 4 बळी घेतल्या होत्या. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 3 कसोटीत 11 बळी घेतल्या आहेत.

Exit mobile version